मनपाच्या नवनिर्वाचित महापौर वंदना मगरे यांचा रावसाहेब दानवे व आ. बबनराव लोणीकर यांच्याहस्ते सत्कार

मनपाच्या नवनिर्वाचित महापौर वंदना मगरे यांचा रावसाहेब दानवे व आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते सत्कार

पुढील वाटचालीस मान्यवरांच्या शुभेच्छा

जालना (प्रतिनिधी) : जालना महानगरपालिकेच्या महापौरपदी वंदना मगरे तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. दिनांक ७ फेब्रुवारी रोजी भोकरदन येथे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते महापौर वंदना मगरे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महापौर वंदना मगरे यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि आमदार बबनराव लोणीकर यांचा आशीर्वाद घेतला. दोन्ही मान्यवरांनी नवनिर्वाचित महापौरांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत, शहराच्या विकासासाठी भक्कम नेतृत्व करण्याचा विश्वास व्यक्त केला.

रावसाहेब पाटील दानवे यांनी आपल्या मनोगतात, महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व विकासकामांना गती देण्यासाठी महापौरांनी प्रभावी भूमिका बजावावी, असे सांगितले. आमदार बबनराव लोणीकर यांनीही महापौर मगरे यांच्या नेतृत्वाखाली जालना शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. या सत्कार सोहळ्याला सुशीला दानवेछत्रपती फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील रत्नपारखेनिरज पट्टेबादुरधनराज काबलियेरजित मगरेसुनील चिखले यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौरपदी निवड झाल्यानंतर वंदना मगरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानत, जालना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असून नागरिकांच्या अपेक्षांवर खरे उतरण्याचा प्रयत्न राहील, अशी भावना व्यक्त केली.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!