अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या विकासाला नवी दिशा : भास्करआबा दानवे

अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या विकासाला नवी दिशा मिळेल

–        भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जालना (प्रतिनिधी) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय  अर्थसंकल्प 2026 संसदेत सादर केला, या संदर्भात केंद्र सरकारच्या धोरणांची, विकासात्मक दृष्टीकोनाची व सर्वसामान्य जनतेसाठी असलेल्या तरतुदींची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला प्रचार-प्रसार व जनजागृती कार्यक्रम आज (ता.07) रोजी वाघ्रूळ ता.जालना येथे  यशस्वीरीत्या संपन्न झाला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाला जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. मार्गदर्शन भाषणात ते म्हणाले की, “केंद्रीय अर्थसंकल्प 2026 हा देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा विकासाचा स्पष्ट आराखडा आहे. शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्ग, महिला आणि युवक यांना केंद्रस्थानी ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. “शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, थेट लाभ हस्तांतरण यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात केलेल्या तरतुदी देशाच्या सर्वांगीण विकासाला गती देतील. देशाला आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवणे हेच सरकारचे ध्येय आहे असेही त्यांनी सांगितले व कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सतीश केळकर सह सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

यावेळी भाजपा नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदलकरवाडी ता.जालना येथील युवकांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला यामध्ये डीगांबर शेळके, सीताराम आसाराम इंदलकर, संपत गणपत इंदलकर, उद्धव विठोबा शिंदे, विजय राधाकिसन शेळके, सिताराम नारायण शिंदे, विष्णू भगवान घोलप, रामेश्वर ज्ञानोबा मोरे, सीताराम शामराव इंदलकर, शिवाजी गणपत इंदलकर, सोनाजी विठ्ठल इंदलकर, काशिनाथ शिंदे, नारायण घोलप, शंकर रामभाऊ इंदलकर, शिवाजी गायकवाड, बळीराम इंदलकर, विठ्ठल नारायण इंदलकर आदींनी प्रवेश केला.

या कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस वसंतराव शिंदे,  तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, प.स. सदस्य गजानन खरात, सरपंच सुधाकर खरात, सरपंच विलास खरात, उपसरपंच गोविंद खरात, विष्णू डोंगरे, विठ्ठल इंदलकर, करण निकाळजे, नागेश अंभोरे, सतीश जारे, शाम खरात, शिवा पाटील खरात, विलासराव खरात, शेवाळे सर, रामजी खरात, शरद खरात, कैलास खरात, राधेश्याम खरात, गणेश शेवाळे, तुळशीदास शेवाळे, शिवाजी गायकवाड, अविनाश मोहिते, गणेश तिडके, संजय वैद्य, अमोल खांडेभराड, जगदीश खरात, विठ्ठल इंदलकर, दत्ता तिडके, संजय खरात, लक्ष्मण खरात, जगन खरात, सुशील बोर्डे, प्रदीप खांडेभराड, करण निकाळजे आदींसह शेतकरी, युवक, महिला व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!