
जालना / प्रतिनिधी :
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जालना येथील नागसेन ग्रंथालयाच्या वतीने निमंत्रित कवींचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. रविवार, १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता, जुना जालना भागातील नागसेन ग्रंथालयात ही काव्य मैफल रंगणार आहे.
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक राम गायकवाड राहतील. यावेळी अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डी. बी. जगतपुरिया, ज्येष्ठ समाजसेवक रमेश देहेडकर, नागसेन ग्रंथालयाचे अध्यक्ष राजेश राऊत आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. विजय कुमठेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सहभागी कवी :
ज्येष्ठ कवी, गझलकार सुनील लोणकर, प्रा. पंढरीनाथ सारके, प्रा. अशोक खेडकर, डॉ. प्रभाकर शेळके, मनीष पाटील, डॉ. बी. जी. श्रीरामे, रेखा गतखणे, दिनेश शेळके, शिवाजी तेलंगे, गणेश खरात, सुहास पोतदार, सर्जेराव खरात, कैलास भाले, विनोद काळे, मनिषा गायकवाड, वैशाली फोके, कांचन थोरवे, जिजा वाघ, प्रदीप घाटेशाही, किशोर भालेराव, आबासाहेब म्हस्के, समाधान खाडे आदी मान्यवर कवींचा सहभाग राहणार आहे.
या कविसंमेलनाचा साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन नागसेन ग्रंथालयाचे अध्यक्ष राजेश राऊत व कवी कैलास भाले यांनी केले आहे.
साहित्यिक वारसा :
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी जालना शहरात विविध सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रम राबविले जातात. त्यांच्या साहित्यिक योगदानाचा भक्कम वारसा जिल्ह्यातून पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो. याच परंपरेचा भाग म्हणून रविवारी आयोजित काव्य संमेलन साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचारांची पेरणी” कवी संमेलन”