पत्रकारांविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; विशाल पिंपळे यांचा तीव्र निषेधटेंभुर्णी पोलिसांना पत्रकार संघाचे निवेदन

पत्रकारांविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; विशाल पिंपळे यांचा तीव्र निषेध
टेंभुर्णी पोलिसांना पत्रकार संघाचे निवेदन

टेंभुर्णी प्रतिनिधी :
सोशल मीडियावर पत्रकारांविषयी बदनामीकारक व अपमानास्पद पोस्ट टाकून मानहानी केल्याप्रकरणी टेंभुर्णी पत्रकार संघाच्या वतीने विशाल पिंपळे यांचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणी विशाल पिंपळे यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी मराठी पत्रकार संघाच्या वतीने टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास भारती व पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खर्डे यांना निवेदन देण्यात आले. विशाल पिंपळे यांनी सोशल मीडियावर “विशाल पाटील वाकडे तुमचा अभिमान वाटतो, बाकीचे पत्रकार दलाल विकले गेले काय?” अशा आशयाची पोस्ट प्रसिद्ध केली होती. या पोस्टमुळे तालुक्यातील पत्रकार बांधवांचा अवमान झाल्याची भावना निर्माण झाली असून पत्रकारांची सामाजिक प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप पत्रकार संघाने केला आहे. या प्रकरणी संबंधित पोस्टची गंभीर दखल घेऊन दोषींवर योग्य त्या कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पत्रकारांबाबत अशा प्रकारची बदनामी सहन केली जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदनावर संजय राऊत, रावसाहेब अंभोरे, पी. जी. तांबेकर, नसीम शेख, अशोक पाबळे, सुनील भाले, चंद्रकांत पंडित, शेख साबेर, गजानन देठे, अलकेश सोमणी, बिडी सवडे, विष्णू मगर, बालाजी शेवाळे, प्रल्हाद जाधव, सिताराम भाले, गजानन शेळके, फखरू कुरेशी, आशिष पैठणे, शेख फिरोज, शंकर सवडे यांच्यासह पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!