महापालिका निवडणूक; प्रभाग क्र. १४ मधून भाजपची उमेदवारांची दमदार फळी मैदानात

भाजपकडून अॅड. रिमा संदीप खरात (काळे), अशोक उर्फ लक्ष्मीकांत मनोहर पांगारकर, गोर्डे सुलोचना लक्ष्मण, घुगे शशिकांत रामकृष्ण यांना मतदान करण्याचे आव्हान

जालना (प्रतिनिधी) : जालना शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १४ मधून भारतीय जनता पार्टीने आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले असून या प्रभागात चारही प्रवर्गांतील उमेदवारांची सक्षम व समतोल फळी निवडणूक रिंगणात उतरली आहे. भाजपकडून अॅड. रिमा संदीप खरात (काळे)  अनुसूचित जाती महिला, अशोक उर्फ लक्ष्मीकांत मनोहर पांगारकर मागासवर्गीय (ओबीसी) पुरुष, गोर्डे सुलोचना लक्ष्मण सर्वसाधारण महिला, घुगे शशिकांत रामकृष्ण सर्वसाधारण प्रवर्ग यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सामाजिक समावेशकता, कायदेशीर जाण, प्रशासकीय अनुभव व स्थानिक प्रश्नांची जाण असलेले हे उमेदवार प्रभागातील नागरी समस्या, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व मूलभूत सोयी-सुविधांवर लक्ष केंद्रित करून जनतेसमोर आपली भूमिका मांडत आहेत. या प्रभागात भाजपचे अधिकृत निवडणूक चिन्ह “कमळ” असून मतदान गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० वाजेपर्यंत होणार आहे. प्रभाग क्र. १४ मध्ये यावेळी चारही प्रवर्गांतील प्रतिनिधित्व असलेली उमेदवारांची टीम उभी राहिल्याने ही लढत विशेष लक्षवेधी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!