भाजपाचे अधिकृत उमेदवार कपिल नाजूकराव अनभोरे (अनुसूचित जाती – पुरुष), कु. साक्षी सोमनाथ गायकवाड (मागासप्रवर्ग – महिला), सौ. स्वातीताई सतीशराव जाधव (सर्वसाधारण महिला), श्री. जगन्नाथ कारभारी चव्हाण (सर्वसाधारण पुरुष)

प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजपाची मजबूत टीम मैदानात; विकास, सुशासन आणि पारदर्शकतेचा निर्धार
जालना (प्रतिनिधी) : जालना शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, भारतीय जनता पार्टीने सर्वसमावेशक, सक्षम आणि विकासाभिमुख उमेदवारांची टीम मतदारांसमोर सादर केली आहे.
प्रभाग क्रमांक १२ मधून भाजपाचे अधिकृत उमेदवार कपिल नाजूकराव अनभोरे (अनुसूचित जाती – पुरुष), कु. साक्षी सोमनाथ गायकवाड (मागासप्रवर्ग – महिला), सौ. स्वातीताई सतीशराव जाधव (सर्वसाधारण महिला), श्री. जगन्नाथ कारभारी चव्हाण (सर्वसाधारण पुरुष) ही चारही उमेदवारांची टीम समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करणारी असून, सामाजिक समता, विकास आणि पारदर्शक प्रशासन यांचा समतोल साधणारी आहे.
भाजपाचे उमेदवार सांगतात की, प्रभाग क्रमांक १२ मध्ये अनेक वर्षांपासून रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सार्वजनिक शौचालये, महिला सुरक्षेचे प्रश्न, युवकांसाठी संधी आणि झोपडपट्टी भागातील मूलभूत सुविधा या बाबींकडे दुर्लक्ष झाले आहे.
आता ही स्थिती बदलायची असून, भाजपाच्या माध्यमातून प्रभागाचा कायापालट घडवून आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे. स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार, वेळेत नागरी सुविधा, नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ उपाय, आणि सरकारी योजनांचा थेट लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे या उमेदवारांचे प्रमुख ध्येय आहे. या चारही उमेदवारांनी स्पष्ट केले की, महिलांसाठी सुरक्षित रस्ते, आरोग्य सुविधा, स्वयंरोजगार योजना, युवकांसाठी क्रीडांगणे, कौशल्य विकास व रोजगाराच्या संधी, आणि दलित, मागासवर्गीय व सर्वसामान्य नागरिकांसाठी समान न्याय व सुविधा उपलब्ध करून देणे हा भाजपाचा प्रभाग क्रमांक १२ साठीचा मुख्य रोडमॅप असेल.
विकासासाठी भाजप–विश्वासासाठी कमळ
