प्रभाग क्रमांक १३ मधून भाजपाचे चार दमदार उमेदवार मैदानात

ओळख नेतृत्वाची… वाटचाल विकासाची!
प्रभाग क्रमांक १३ मधून भाजपाचे चार दमदार उमेदवार मैदानात
सौ. भाग्यश्री सुजितकुमार जोगस, सौ. अनामिका विजय पांगारकर, श्री. महेश विष्णू निकम आणि अॅड. ज्ञानेश्वर रावसाहेब ढोबळे यांना निवडून देण्याचे केले आव्हान
जालना (प्रतिनिधी) : जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मध्ये भाजपाकडून चार मजबूत आणि विश्वासार्ह उमेदवार रिंगणात उतरले असून, या प्रभागात विकासाचा नवा अध्याय लिहिण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
भाजपाचे अधिकृत उमेदवार सौ. भाग्यश्री सुजितकुमार जोगस, सौ. अनामिका विजय पांगारकर, श्री. महेश विष्णू निकम आणि अॅड. ज्ञानेश्वर रावसाहेब ढोबळे हे चारही उमेदवार प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांसाठी परिवर्तनाचा विश्वास घेऊन मैदानात उतरले आहेत. या चारही उमेदवारांचा जनतेशी थेट संवाद, स्थानिक प्रश्नांची जाण आणि काम करण्याची तत्परता यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, उद्याने, स्ट्रीटलाइट्स तसेच महिला व युवकांसाठी विशेष योजना राबवण्याचे ठोस आश्वासन त्यांनी दिले आहे. भाजपाचे नेतृत्व म्हणजे पारदर्शक कारभार, विकासाची दिशा आणि जबाबदार प्रशासन अशी ओळख आहे. याच ओळखीवर विश्वास ठेवून प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांनी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
ओळख नेतृत्वाची… उद्याच्या विकासाची… आता मत आपल्या प्रभागाच्या विकासालाच! हा संदेश घेऊन भाजपाचे उमेदवार घरोघरी पोहोचत असून, नागरिकांच्या समस्यांना तात्काळ न्याय देणारे मजबूत प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन देत आहेत. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ मधील मतदारांनी योग्य, सक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्व निवडून देऊन आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास साधावा, असे चित्र सध्या प्रभागात दिसून येत आहे.
