कालिका स्टील आणि…..

कालिका स्टीलचा KREATE 2025: शाश्वततेच्या गौरवाने सजला विश्वकर्मा दिन

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि नावीन्याला मिळाला मोठा मंच

जालना (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील आघाडीचा टीएमटी बार उत्पादक आणि शाश्वततेच्या क्षेत्रातील अग्रणी कालिका स्टीलने विश्वकर्मा दिनानिमित्त जालना येथे आपल्या प्रतिष्ठित उपक्रमाची दुसरी आवृत्ती “KREATE 2025” यशस्वीरीत्या पूर्ण केली. “Celebrating Sustainability – A Tribute to the Changemakers” या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत आर्किटेक्चर, सिव्हिल व स्ट्रक्चरल अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी शाश्वततेचे महत्व अधोरेखित करणाऱ्या ट्रॉफी डिझाईन्स साकारल्या.

या कार्यक्रमात राज्यभरातून १००० हून अधिक संघांनी सहभाग नोंदवला, त्यापैकी ५० संघांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. जालना येथील गोकुळ लॉन्स, गॅलेक्सी हॉटेलमध्ये अंतिम सादरीकरण पार पडले.


विजेते संघ आणि गौरव

स्पर्धेचा समारोप विजेत्या संघांच्या घोषणेसह झाला.
🏆 प्रथम विजेते संघ – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (COEP)
🏆 द्वितीय विजेते संघ – पी. आर. पोते पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अमरावती
🏆 तृतीय विजेते संघ – ठाकूर कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, मुंबई

प्रत्येक विजेत्या संघाला रु. १,००,००० चे बक्षीस देण्यात आले.

याशिवाय, सांत्वन पारितोषिक (रु. १०,०००) मिळालेले संघ:

  • एन. डी. एम. व्ही. पी. शरदचंद्र पवारजी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, नाशिक
  • कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (KIT’s), कोल्हापूर
  • डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पुणे

प्रेरणा व संकल्पना

विद्यार्थ्यांना त्यांच्या डिझाईन्ससाठी प्रेरणा मिळाली बदल घडवणाऱ्यांकडून (Changemakers) :

  • शिखा शाह, संस्थापक व CEO, Scrapshala – अपसायकलिंगद्वारे शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन.
  • पुरणसिंग राजपूत, सहसंस्थापक व COO, EF Polymer – फळांच्या टाकाऊ पदार्थांपासून जैवविघटनक्षम माती सुधारक.
  • गौरी मिराशी, सहसंस्थापक, Ecosattva Environmental Solutions – नद्या व परिसंस्थांचे समावेशक पुनरुज्जीवन.

प्रत्येक डिझाईनमध्ये टीएमटी स्टील बारचा वापर करून लवचिकता व परिवर्तनाचे प्रतीक अधोरेखित करण्यात आले.


तज्ञांचे मार्गदर्शन आणि मूल्यांकन

या स्पर्धेचे परीक्षक होते –

  • अर्किटेक्ट यतीन पंड्या, प्रिन्सिपल आर्किटेक्ट, Footprints E.A.R.T.H
  • संजय जमकर, स्ट्रक्चरल इंजिनिअर, Archi Dtales

त्यांनी विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण विचारांचे व शाश्वत डिझाईन्सचे कौतुक केले.
यतीन पंड्या म्हणाले, “KREATE ही फक्त डिझाईन स्पर्धा नाही, तर विद्यार्थ्यांना स्टील प्रत्यक्ष हाताळण्याची व त्याची ताकद समजून घेण्याची दुर्मिळ संधी देते.”
संजय जमकर म्हणाले, “विद्यार्थ्यांनी दाखवलेली सर्जनशीलता आणि स्ट्रक्चरल समज अभूतपूर्व आहे. या उपक्रमामुळे वर्गखोल्यांतील शिक्षण व प्रत्यक्ष अनुभव यातील दरी कमी झाली आहे.”


कालिका स्टीलचा दृष्टीकोन

या कार्यक्रमाच्या समारोपावेळी कालिका स्टीलचे संचालक गोविंद गोयल म्हणाले :
“KREATE 2025 द्वारे आम्ही तरुणांना शाश्वततेसारख्या महत्त्वपूर्ण विषयाकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढची पिढीचे अभियंते व आर्किटेक्ट्स हेच भविष्यातील खरे बदल घडवणारे ठरणार आहेत.”

कालिका स्टीलची स्थापना २००३ मध्ये जालना येथे झाली.
आज ती महाराष्ट्रातील आघाडीची टीएमटी बार उत्पादक कंपनी आहे. कंपनीने शून्य-उत्सर्जन जल पुनर्वापर, स्लॅगचा नदीच्या वाळूऐवजी वापर, आणि एंड-ऑफ-लाईफ स्टीलचा अवलंब असे पर्यावरणपूरक उपक्रम राबवले आहेत.
शिक्षण, ग्रामीण क्रीडा व युवक कौशल्य विकासासाठीही कालिका स्टील आग्रही आहे. KREATE सारख्या उपक्रमांमुळे हीच दृष्टी पुढील पिढीपर्यंत पोहोचवली जात आहे. KREATE 2025 हा केवळ स्पर्धा नसून शाश्वत उद्याच्या दिशेने टाकलेले एक ठोस पाऊल आहे.


|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!