अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी पोलीस महानिरीक्षक जिल्हा पोलिसांचे कान टोचणार का?


अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी पोलीस महानिरीक्षक जिल्हा पोलिसांचे कान टोचणार का?

जालना (प्रतिनिधी):
जालना शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्यासाठी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस (आय. जी.), छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र हे आज जालना दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या भेटीमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था विषय पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

शहरात आणि ग्रामीण भागात गुटखा, मटका, दारू अशा अवैध धंद्यांचे जाळे पसरले असून, काही ठिकाणी या धंद्यांना पोलीस ठाण्यांच्या पाठीशीच मिळत असल्याचे आरोप नागरिक सातत्याने करत आहेत. त्यामुळेच, आय. जी. जिल्हा पोलिसांना कठोर शब्दांत कान टोचणार का? असा प्रश्न सामान्यांमध्ये जोरात उपस्थित केला जात आहे.

दौऱ्यादरम्यान इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेणार असून, अवैध धंद्यांवर धडक कारवाईसंदर्भात कोणत्या ठोस सूचना देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागरिकांच्या अपेक्षा आहेत की या दौऱ्यानंतर जिल्ह्यात गुटखा माफियांना आणि इतर अवैध धंद्यांना मोकळीक मिळणार नाही. तसेच पोलिस प्रशासन अधिक कडक भूमिका घेऊन जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी प्रभावी पावले उचलेल.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!