गायीची कत्तल करतानाचा व्हिडीओ व्हायरल; मुख्य आरोपीसह तिघांना सदर बाजार पोलिसांची अटक


गायीची कत्तल करतानाचा व्हिडीओ व्हायरल; मुख्य आरोपीसह तिघांना सदर बाजार पोलिसांची अटक

जालना (प्रतिनिधी): सोशल मीडियावर गायीची कत्तल करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी फरार असलेल्या मुख्य आरोपीसह तिघांना अखेर सदर बाजार पोलिसांनी गुप्त कारवाई करून अटक केली आहे.

दिनांक 01 सप्टेंबर 2025 रोजी सोशल मीडियावर तीन इसम गोवंश जातीचे प्राणी कापतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गु. र. नं. 745/2025 अन्वये कलम 299, 3(5) बीएनएस सह कलम 5(क), 9, 9(अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी असलम महेमूद कुरेशी, रा. मंगळबाजार, जालना दोन अनोळखी इसम. गुन्हा दाखल झाल्यापासून हे सर्व आरोपी फरार होते.

फरार आरोपींच्या शोधासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाणे व स्थागूशा जालना येथील वेगवेगळी चार पथके गठीत करून आरोपींचा शोध हैद्राबाद, खुलताबाद (छ. संभाजीनगर), मानवत, पाथरी (परभणी) अशा ठिकाणी राबविण्यात आला. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने आरोपींचा माग काढला आणि अखेर असलम कुरेशी (मुख्य आरोपी), सोफीयान शेख समद, रा. चमडाबाजार, जालना, यासीन रशीद कुरेशी, रा. राजणी, ता. घनसावंगी या आरोपींना ताब्यात घेतले. सदर आरोपींविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्यात आता संघटित गुन्हेगारी व आयटी अॅक्टअंतर्गत अतिरिक्त कलमे लावण्यात आली असून पुढील तपास पोलिसांनी हाती घेतला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सलअप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती (सदर बाजार), स्थागूशा पोलीस निरीक्षक पंकज जाधव  सपोनि उबाळे, पोउपनि शैलेश म्हस्के, पोउपनि सचिन सानप, पोउपनि संजय, पोहेकॉ धनाजी का. वळे, पोहेकॉ सुभाष पवार, शिवहरी गवई, जगन्नाथ जाधव, बाबा हरणे, नजीर पटेल, लक्ष्मीकांत आडेप, सतीश श्रीवास, प्रशांत लोखंडे, शारदा गायकवाड, भगवान मुंजाळ, दूर्गेश गोफणे, अजिम शेख, गणेश तेजनकर, राहूल कटकम, धंनजय लोढे, धीरज भोसले, तसेच चालक मोहन हिवाळे, कल्पेश पाटील, सददाम सय्यद आदींचा मोलाचा सहभाग होता.

सदर आरोपींना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी मागितली जाणार असून या प्रकरणी अजून काही आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!