बाप्पाच्या विसर्जनासाठी तब्बल 19 कोटीचा विसर्जन कुंड…

बाप्पाच्या विसर्जनासाठी तब्बल 19 कोटीचा विसर्जन कुंड…

आमदार खोतकर व आयुक्त खांडेकर यांच्या हस्ते उद्या होणार पूजन 

महानगरपालिकेचा उपक्रम – प्रदूषणमुक्त व सुरक्षित विसर्जनासाठी नवी सुविधा

जालना (प्रतिनिधी) : जालना शहरातील गणेशभक्तांसाठी यावर्षीची गणेशोत्सवाची विसर्जन यात्रा ऐतिहासिक ठरणार आहे. शहरातील तीन लाखांवर लोकसंख्येचा विचार करून तसेच यापूर्वी विसर्जनावेळी झालेल्या दुर्घटना लक्षात घेऊन जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने तब्बल १९ कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक विसर्जन कुंड उभारण्यात आले आहे.


विसर्जनासाठी कुंडाचे विशेष महत्त्व

छत्रपती संभाजी महाराज विसर्जन कुंड, मोती तलाव परिसरात हे काम करण्यात आले आहे. गणपती, दुर्गादेवी मूर्ती विसर्जनासह छटपूजा यासारखे धार्मिक कार्यक्रम या कुंडामध्येच पार पडतील. या उपक्रमामुळे विसर्जन अधिक शिस्तबद्ध, सुलभ व प्रदूषणमुक्त होणार आहे.


उद्घाटनाचा सोहळा आज

हा विसर्जन कुंड तात्पुरत्या स्वरूपात यावर्षी विसर्जनासाठी खुला केला जात आहे. या कुंडाचे पूजन व पाहणी कार्यक्रम आज, शुक्रवार दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी व गणेशभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


प्रमुख उपस्थिती

या उपक्रमासाठी आमदार अर्जुन खोतकर व महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी विशेष पुढाकार घेतला असून, त्यांच्या हस्ते विसर्जन कुंडाचे पूजन करण्यात येणार आहे.


|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!