समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

कडवंची शिवारात ट्रॅव्हल्सचा अपघात; २० प्रवासी जखमी

जालना (प्रतिनिधी) :
जालना तालुक्यातील कडवंची शिवारात समृद्धी महामार्गावर आज (दि. २ सप्टेंबर) पहाटे झालेल्या भीषण अपघातात लक्झरी ट्रॅव्हल्समधील तब्बल २० प्रवासी गंभीर जखमी झाले. पुण्याहून नागपूरकडे जाणारी ही ट्रॅव्हल्स (क्र. बीआर-०६ पीजी-५५८१) समोरून जात असलेल्या वाहनाला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला.

पहाटे साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या अपघातामुळे ट्रॅव्हल्समधील साखरझोपेत असलेल्या प्रवाशांना मोठा धक्का बसला. यात चालकासह एकूण २० प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी जालना जिल्हा शासकीय रुग्णालय व सिंदखेडराजा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्राचे उपनिरीक्षक अशोक काळे, कर्मचारी पी. डी. राठोड, गवई, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान व क्युआरटी टीम घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्तांना ट्रॅव्हल्समधून सुरक्षित बाहेर काढून तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविण्यात आले.

या घटनेत तालुका पोलीस ठाण्याचे पथकही घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य केले. दरम्यान, पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स रस्त्यावरून बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!