भीषण अपघात पाच जणांचा जागीच मृत्यू


भीषण अपघात 
पाच जणांचा जागीच मृत्यू

गाडेगव्हाणजवळ चारचाकी विहिरीत कोसळली; पाच जणांचा जागीच मृत्यू

जालना :
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी–राजूर रोडवर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. गाडेगव्हाण फाट्याजवळ ह्युंदाई आय २० कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल विहिरीत कोसळली. या भीषण घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये एकाच कुटुंबातील सदस्य

अपघातात फुलंब्री तालुक्यातील गुंगी गेवराई येथील ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकलेनिर्मला सोपान डकले, कोपर्डा (ता. भोकरदन) येथील पद्माबाई लक्ष्मण भामीरेज्ञानेश्वर लक्ष्मण भामीरे व चालकाचा मृत्यू झाला. हे सर्वजण नातेवाईकाला पॅरलेसिसच्या उपचारासाठी मेहकर तालुक्यातील सुलतानपूर येथे जात होते.

माजी सरपंचाला जोराची धडक

घटना घडली तेव्हा गाडी गाडेगव्हाण येथील रस्त्यावरून जात असताना माजी सरपंच भगवान बनकर आणि त्यांचे सहकारी सकाळी व्यायामासाठी चालत होते. कारने त्यांना जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जालना येथील कलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

७० फूट खोल विहिरीत बचावमोहीम

ही दुर्घटना सकाळी साधारण ५ वाजता घडली. अपघातानंतर स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. विहिरीची खोली सुमारे ७० फूट असून पाणीपातळी ६० फूट असल्याने बचावकार्य अत्यंत कठीण ठरले. त्यामुळे अग्निशमन दल व एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले असून गाडी व मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एक मृतदेह वर काढण्यात आला असून उर्वरितांसाठी कार्यवाही सुरू आहे.

गावकऱ्यांमध्ये हळहळ

अचानक घडलेल्या या भीषण अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये बहुतेक जण नातेवाईक असल्याने गावात शोककळा पसरली आहे.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!