एका वर्षासाठी हर्सूल कारागृहात रवानगी

कुख्यात वाळू तस्कर सुयोग सोळुंके “तडीपार”
एका वर्षासाठी हर्सूल कारागृहात रवानगी
अंबड/जहीर शेख
गोदावरीच्या नदी पात्रात दहशत माजावणाऱ्या व अधिकारी कर्मचाऱ्यांना तसेच शेतकरी, सामान्य नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला तडीपार करण्यात आले असून त्याची रवानगी औरंगाबादच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली गुंड प्रवत्तीच्या लोकांवर पोलीस प्रशासना कडून एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव तयार करून त्यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई सुरू असून. त्याच पार्श्वभूमीवर गोंदी पोलीस ठाणे हद्दीतील कुख्यात वाळू तस्कर सुयोग ऊर्फ सुशील मधुकर सोळुंके वर्षे, रा. गोंदी, ता. अंबड या वाळू तस्कराविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली.
सदरील इसमाविरुद्ध गौणखनिज वाळू चोरीसह विविध गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध पूर्वी प्रतिबंधक कारवाई करूनही त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती चालूच होती त्यामुळे गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव तयार करून तो कारवाई साठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला होता.दिनांक २३ ऑगस्ट रोजी
मा. जिल्हादंडाधिकारी यांनी सदरील प्रस्ताव मंजूर करून कुख्यात सुयोग सोळुंके यास ताब्यात घेऊन जिल्हा मध्यवर्ती कारागृह औरंगाबाद येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला.
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील अशा प्रकारचे सराईत गुन्हेगारांची गुन्हानिहाय यादी तयार करण्यात आली असून भविष्यात त्यांच्याविरुद्धही प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखाली सपोनि योगेश उबाळे, सचिन खामगळ, आशिष खांडेकर, पोउपनि के. आर. हावले, बालाजी पदमने तसेच अंमलदार रुस्तुम जैवाळ, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, फुलचंद हजारे, अशोक नागरगोजे, दिपक भोजणे यांनी कार्यवाही पार पाडली.
