पारध गाव हादरलं – चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा खून करून पतीची गळफास घेऊन आत्महत्याजालना

 पारध गाव हादरलं !

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून, पतीने गळफास घेऊन संपवलं आयुष्य

जालना (प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यातील पारध गावात आज  घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिचा गळा आवळून खून केला व त्यानंतर स्वतःने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत दाम्पत्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हा वाद चिघळला आणि अखेर आज पतीने संतापाच्या भरात पत्नीचा खून करून घेतला. पत्नीचा खून केल्यानंतर त्याने गळफास घेतला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठविण्या ची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.

एका विवाहित जोडप्याने अशा प्रकारे आपले जीवन संपवल्याने पारध गावात शोककळा पसरली आहे. नातेवाईक व गावकरी हतबल झाले असून, या घटनेमुळे कौटुंबिक वाद किती भयावह ठरू शकतो, याचे चित्र सर्वांसमोर आले आहे.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!