अप्पर पोलीस अधिकारी  यांची धडाकेबाज कारवाई – तब्बल एक कोटींचा गुटखा जप्त?

अप्पर पोलीस अधिकारी  यांची धडाकेबाज कारवाई – तब्बल एक कोटींचा गुटखा जप्त?

जालना : शहर व परिसरात गुटखा विक्रीवर कठोर बंदी असताना देखील गुपचूप सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्रीवर ॲडिशनल पोलिस अधीक्षकांच्या पथकाने धडाकेबाज कारवाई केली. या कारवाईत तब्बल एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही छापा टाकून मोठा साठा उघड केला. या प्रकरणी प्रमुख आरोपीसह इतर काही जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.

दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईनंतर ‘लालाचा काला चिट्ठा’ देखील समोर आल्याची माहिती मिळत आहे. गुटखा माफियाचा संपूर्ण काळा धंदा पोलिसांच्या रडारवर असून, या प्रकरणामुळे जिल्ह्यात गुटखा माफियांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!