दहीहंडीप्रसंगी कैलास गोरंट्याल यांचा भन्नाट डान्स

जालना/प्रतिनिधी

जालना शहरातील लोधी मोहल्ला येथे दहीहंडीच्या कार्यक्रमादरम्यान माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भन्नाट डान्स सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. ‘मच गया शोर सारी नगरी में आया है, या गाजलेल्या गाण्यावर त्यांनी दिलखुलासपणे नृत्य करत स्वतःतील कलाकार-डान्सरची झलक दाखवली.

कैलास गोरंट्याल हे राजकारणासोबतच नेहमीच वेगवेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने लोकांमध्ये परिचित आहेत. शेरो-शायरी, भाषणशैली, संवादकौशल्य याबरोबरच डान्समधील त्यांचा उत्स्फूर्त सहभाग हा लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतो. जालन्यातील नागरिकांनी अनेकदा त्यांच्या कार्यक्रमातील अनोख्या अदा पाहिल्या असून, यावेळी दहीहंडी कार्यक्रमात त्यांनी दाखवलेल्या डान्सने वातावरण उत्साहवर्धक केले.

कार्यक्रमाच्या वेळी गोरंट्याल यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. गोरंट्याल यांनीही उपस्थितांना शुभेच्छा देत सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांगितले.

त्यांच्या या परफॉर्मन्सनंतर सोशल मीडियावरही “गोरंट्याल यांचा डान्स” हा चर्चेचा विषय ठरला असून, अनेकांनी त्यांचा हा अनोखा अंदाज कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले आहे.





|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!