जाफराबाद नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश

जालना (प्रतिनिधी) – जाफराबाद नगरपंचायत येथील चार नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. आज शनिवार, १६ ऑगस्ट रोजी जालना जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा पार पडला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला.

यावेळी नगरसेवक शेख मुश्ताक शेख रशीद, नगरसेवक तालीब खाॅन तय्यब खाॅन पठाण, नगरसेवक शेख रऊफ शेख रहीम, नगरसेविका श्रीमती सुनीता सुमित गोफणे तसेच विजय गोफणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला.

या प्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शहा आलम खान, जालना विधानसभा अध्यक्ष प्रतापराव शिंदे, जालना जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब चितेकर, जालना शहर कार्याध्यक्ष मिर्झा अन्वर बेग, शेख महेमूद, जाफराबाद तालुका अध्यक्ष दत्तू पाटील अंभोरे, जालना तालुका अध्यक्ष संतोष ढेंगळे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष शिवचरण बाळराज, शहर उपाध्यक्ष प्रतापराव लहाने, विष्णू घुले, सलमान पठाण आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जालना जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांनी नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करताना म्हटले की, “अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनतेच्या हिताचे ठोस निर्णय घेत असून, पक्षाचा विस्तार ग्रामीण भागासह शहरी भागातही झपाट्याने होत आहे. जाफराबाद नगरसेवकांच्या प्रवेशामुळे पक्षाला नवे बळ मिळाले आहे.”

या प्रवेशामुळे जाफराबाद नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अधिक मजबूत झाली आहे.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!