
मंठा (प्रतिनिधी) – रक्षाबंधन व स्वातंत्र्य दिनानिमित्त नगर पंचायत कार्यालयातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना साडी-चोळीचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष व बाजार समिती संचालक वैजनाथ बोराडे, उपनगराध्यक्ष अरुण वाघमारे, माजी उपनगराध्यक्ष जे.के. कुरेशी, नगरसेवक अचित बोराडे, शेषनारायण दवणे, उबेद बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
