
जालना (प्रतिनिधी) – जालना शहरातील मंठा चौफुली येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जयंती आनंदमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र राख यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, सरपंच गजानन ढाकणे, राजेंद्र कायंदे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
