
सिल्लोड प्रतिनिधी :
सिल्लोड तालुक्यातील शिवना गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गुरुवारी (दि.१४) “कन्या सन्मान दिवस” मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला.
कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला तसेच मुलींसाठी विशेष आरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबिरात सर्व मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी सिल्लोड वकील महासंघाच्या वतीने गर्भलिंग निदान प्रतिबंधक (PCPNDT) कायदा याबाबत जनजागृती करण्यात आली. वकील शेख इम्तियाज यांनी कायद्यातील तरतुदी व शिक्षेची माहिती दिली.
गटविकास अधिकारी रतन पगारे यांनी कुटुंबात मुलगी झाल्यास आनंदाने तिचे स्वागत करण्याचे आवाहन केले. यामुळे समाजातील मुलींचा जन्मदर वाढविण्यास हातभार लागेल असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास गटविकास अधिकारी रत्नाकर पगारे, ADO पाटील, सरपंच डॉ. सलमान खान, मंडळ अधिकारी विजय शेळके, तलाठी रवींद्र कुलकर्णी, ग्रामविकास अधिकारी रवींद्र गंगावणे, वकील इम्तियाज शेख, पंचायत समितीचे बुलबुले सर, कृषी सहाय्यक विनोद पवार, अंगणवाडी सुपरवायझर पाटील मॅडम, आरोग्य अधिकारी वैष्णवी मॅडम यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली तसेच आरोग्य शिबिरात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
