जालना / प्रतिनिधी :
जालना तालुक्यातील साळेगाव नेर तांडा येथे गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे साईराम बाला चव्हाण यांच्या घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेमुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर साईराम बाला चव्हाण यांनी प्रशासनाकडे त्वरीत पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

