नागसेन ग्रंथालयात आज रंगणार काव्य मैफल

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कविसंमेलन

जालना / प्रतिनिधी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जालना येथील नागसेन ग्रंथालयाच्या वतीने निमंत्रित कवींचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. रविवार, 17 ऑगस्ट रोजी जुना जालना भागातील नागसेन ग्रंथालयात सायंकाळी सहा वाजता ही काव्य मैफल रंगणार आहे. 

         या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक राम गायकवाड हे राहतील. यावेळी अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डी.बी. जगतपुरिया, ज्येष्ठ समाजसेवक रमेश देहेडकर, नागसेन ग्रंथालयाचे अध्यक्ष राजेश राऊत, ज्येष्ठ विचारवंत डॉ. विजय कुमठेकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.

    या कविसंमेलनात ज्येष्ठ कवी, गझलकार सुनील लोणकर, प्रा. पंढरीनाथ सारके, प्रा. अशोक खेडकर, डॉ. प्रभाकर शेळके, मनीष पाटील, डॉ.बी.जी. श्रीरामे, रेखा गतखणे, दिनेश शेळके, शिवाजी तेलंगे, गणेश खरात, सुहास पोतदार, सर्जेराव खरात, कैलास भाले, विनोद काळे, मनिषा गायकवाड, वैशाली फोके, कांचन थोरवे, जिजा वाघ, प्रदीप घाटेशाही, किशोर भालेराव, आबासाहेब म्हस्के, समाधान खाडे हे कवी सहभागी होतील. या काव्य संमेलनाचा साहित्य रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन नागसेन ग्रंथालयाचे अध्यक्ष राजेश राऊत व कवी कैलास भाले यांनी केले आहे. 

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!