
नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड येथील पि.एम. श्री केंद्रीय विद्यालय, रेल्वे डिव्हिजन येथे ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी पत्रकार अॅड. गौरव उद्धवराव सरोदे यांचा विद्यालयाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सत्कार समारंभात प्राचार्य अशोककुमार विश्वकर्मा, मुख्याध्यापक राम श्रुंगारे, ग्रंथालय प्रमुख मितेश हनवते, पदव्युत्तर शिक्षक गुलशनकुमार हंस, वर्गशिक्षक आदी उपस्थित होते. मान्यवरांनी पत्रकार सरोदे यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकवृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते, भाषणं व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून टाकले.यावेळी विद्यार्थी सुशांत गौरव सरोदे यांच्यासह इतर विद्यार्थ्यांनी विशेष आकर्षण ठरले.
