मकतब अय्यूब गोल्डन सिटी येथे नात-ए-नब स.चा आध्यात्मिक सोहळा संपन्न

जालना प्रतिनिधी,

शहरातील जुना जालना येथे मकतब अय्यूब गोल्डन सिटीमध्ये नुकताच एक हृदयस्पर्शी व ईमान वाढवणारा नात-ए-नब स. स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मकतबमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. लहान मुलांपासून मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी पैगंबर मोहम्म स. यांच्या दरबारात अत्यंत सुरेल आवाजात, आदर व प्रेमाने नात सादर केल्या. संपूर्ण सभागृहात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले व प्रेम-ए-रसूल स. ने महफिल भारून गेली।

या प्रसंगी मकतबचे नाझिम मौलाना एजाज सिराजी यांनी नात-ए-नबी स चे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, नात पठण हे मुस्लिमांच्या धार्मिक व आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. हे फक्त एक कला नसून प्रेम व श्रद्धेचे जिवंत प्रदर्शन आहे. नात पठणामुळे हृदयात पैगंबर स यांचे प्रेम वाढते, ऐकणाऱ्यांची मने मऊ होतात व त्यांच्या ईमानात नवचैतन्य निर्माण होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, पैगंबर स यांचे जीवनचरित्र आपल्या आयुष्यात अवश्य उतरवावे, कारण हेच खरी नात पठणाची उंची आहे।

स्पर्धेचे परीक्षक मौलाना जुबैर नदवी आणि हाफिज अदनान यांनी प्रामाणिकपणे व बारकाईने आपले कर्तव्य पार पाडले. विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी तयार करण्यामध्ये मौलाना एजाज सिराजी, मौलाना शुऐब नदवी व मौलाना इरफान यांचा मोलाचा वाटा होता।

प्रथम क्रमांकावर अब्दुर्रकीब इब्न अनीस अन्सारी तर
द्वितीय क्रमांक: तनीशा बिंत शेख शम्सुद्दीन,
तृतीय क्रमांक: लाएबा बिंत इदरीस अन्सारी व रम्शा बिंत शेख हनीफ या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला मकतब चे प्राध्यापक व परिसरातील मान्यवर नागरिक व नमाजकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मौलाना शुऐब नदवी यांच्या वतीने या कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये चहा बिस्किटे वाटण्यात आले शेवटी कार्यक्रम संपन्न झाला.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!