तरुणांनो व्यसनमुक्त राहून आंनदीत जीवन जगाहभप शेलुदकर यांचा पारध येथे कीर्तनातून सल्ला

पारध (प्रतिनिधी):हा काळ अतिशय खडतर असून प्रत्येकाने सावधगिरीने राहायला हवं.आणि तरुण पिढीने व्यसनापासून अलिप्त राहून आनंदी जीवन जगायला हवे.असा सल्ला ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर यांनी पारध बु.येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आयोजित कीर्तन महोत्सव प्रसंगी दिला.
भोकरदन तालुक्यातील पारध बु.येथे ३ ऑगस्ट ते १० ऑगस्ट दरम्यान येथील महर्षी पराशर मंदिर सभागृहात युवा कीर्तनकार ह.भ.प.अंबादास महाराज लोखंडे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा,श्रीमद भागवत कथा व कीर्तन महोत्सव सुरू असून या कीर्तन महोत्सवा दरम्यान शुक्रवार(दि.८)रोजी रात्री ९ ते ११ या वेळेत व्यसनमुक्तीचे अजन्म प्रचारक,प्रसिध्द समाजप्रबोधनकार ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन पार पडले.यावेळी ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली यांनी कीर्तनाला उपस्थित तरुण तरुणींची लक्षणीय उपस्थिती हेरून तरुणांना सल्ला देताना सांगितले की, ईश्वराच्या मार्गावर अग्रेसर रहा म्हणजे इतरत्र भटकण्याची वेळ येणार नाही त्यासाठी परमार्थाची कास धरली पाहिजे.तरुणींना सल्ला देताना ते म्हणाले की,आपल्या आई वडीलांनी आपल्यासाठी केलेल्या त्यागाचे स्मरण करत जा आणि समाजात त्यांची मान शरमेने झुकवावी लागेल असे कृत्य करू नका.
दरम्यान यावेळी माऊली महाराजांनी व्यसनमुक्तीसह विविध विषयांवर प्रकाश टाकला.या कीर्तनासाठी पारध आणि परिसरातील पारध खुर्द, लेहा,शेलुद, करजगाव,पद्मावती येथील शेकडो भाविक उपस्थित होते.तरुणांची लक्षणीय उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली.तरुणांनो व्यसनमुक्त राहून आंनदीत जीवन जगा
हभप शेलुदकर यांचा पारध येथे कीर्तनातून सल्ला
पारध (प्रतिनिधी):हा काळ अतिशय खडतर असून प्रत्येकाने सावधगिरीने राहायला हवं.आणि तरुण पिढीने व्यसनापासून अलिप्त राहून आनंदी जीवन जगायला हवे.असा सल्ला ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर यांनी पारध बु.येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आयोजित कीर्तन महोत्सव प्रसंगी दिला.
भोकरदन तालुक्यातील पारध बु.येथे ३ ऑगस्ट ते १० ऑगस्ट दरम्यान येथील महर्षी पराशर मंदिर सभागृहात युवा कीर्तनकार ह.भ.प.अंबादास महाराज लोखंडे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा,श्रीमद भागवत कथा व कीर्तन महोत्सव सुरू असून या कीर्तन महोत्सवा दरम्यान शुक्रवार(दि.८)रोजी रात्री ९ ते ११ या वेळेत व्यसनमुक्तीचे अजन्म प्रचारक,प्रसिध्द समाजप्रबोधनकार ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन पार पडले.यावेळी ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली यांनी कीर्तनाला उपस्थित तरुण तरुणींची लक्षणीय उपस्थिती हेरून तरुणांना सल्ला देताना सांगितले की, ईश्वराच्या मार्गावर अग्रेसर रहा म्हणजे इतरत्र भटकण्याची वेळ येणार नाही त्यासाठी परमार्थाची कास धरली पाहिजे.तरुणींना सल्ला देताना ते म्हणाले की,आपल्या आई वडीलांनी आपल्यासाठी केलेल्या त्यागाचे स्मरण करत जा आणि समाजात त्यांची मान शरमेने झुकवावी लागेल असे कृत्य करू नका.
दरम्यान यावेळी माऊली महाराजांनी व्यसनमुक्तीसह विविध विषयांवर प्रकाश टाकला.या कीर्तनासाठी पारध आणि परिसरातील पारध खुर्द, लेहा,शेलुद, करजगाव,पद्मावती येथील शेकडो भाविक उपस्थित होते.तरुणांची लक्षणीय उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!