राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्याची सुरुवात; इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावे : माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांचे आवाहन 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्याची सुरुवात; इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावे : माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांचे आवाहन 

जि.प., पं.स. आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी जोरदार पूर्वतयारीला वेग

जालना (प्रतिनिधी):

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) जालना जिल्हा स्तरावर जोरदार तयारीला लागली आहे. जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका आणि इच्छुक उमेदवारांशी सविस्तर चर्चा सुरू आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आगामी निवडणुकांमध्ये शिव, शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची शिदोरी घेऊन मैदानात उतरण्यास सज्ज असल्याचे चित्र दिसत आहे.

जालना जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांत निवडणूक आढावा बैठकांना मोठा प्रतिसाद मिळत असून, पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी —माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, शिवाजीराव चौथे, प्रदेश उपाध्यक्ष मधुकरराव आर्दड, रविंद्र तौर, चंद्रकांत कारके, शाह आलमखान, शेख महेमूद, अण्णासाहेब चित्तेकर, बळीराम कडपे, मिर्झा अन्वर बेग, जयमंगल जाधव, लक्ष्मण दळवी, मंगलताई पाटील, ज्ञानेश्वर सरकटे आदींचा जिल्हाभर दौरा सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांनी जिल्ह्यातील जि.प., पं.स. आणि नगर परिषद निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया औपचारिकरीत्या सुरू केली आहे.

यानंतर पक्षाची जिल्हा कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये प्राप्त झालेल्या अर्जांचा आढावा घेत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती पक्षाच्यावतीने देण्यात आली आहे.

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!