पोलीस प्रशासन महिन्याला लाखोंचा मलिदा घेतय…त्यामुळे बांडगुळावर कारवाई करण्यासाठी भीतय…!

पोलीस प्रशासन महिन्याला लाखोंचा मलिदा घेतय…त्यामुळे लाला सारख्या बांडगुळावर कारवाई करण्यासाठी भीतय…!

जालना (प्रतिनिधी) : जालना शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा आजही येतो कसा असा प्रश्न थेट आता जनतेतून उपस्थित केला जात आहे. आज दुर्गा मातेचे विसर्जन आहे. नंतर रात्री रावणाचे दहन करण्यात येणार आहे. तो रावण तरी चांगला होता सतीश जयस्वाल उर्फ लाला सारखा बांडगुळ रावण हा जालना जिल्ह्यातील जनतेला विष देऊन ठार मारत आहे. त्याला तडीपार करण्यासाठी पोलीस प्रशासनातील अधिकारी का पुढे येत नाही असा प्रश्न पडत असल्यामुळे जनतेतून बोलले जाते की, पोलीस प्रशासन महिन्याला लाखोंचा मलिदा घेतय…त्यामुळे लाला सारख्या बांडगुळावर कारवाई करण्यासाठी भीतय…!

जालना शहरात दररोज टनोनटन गुटखा कसा पोहोचतो, कोणत्या छत्रछायेखाली हा व्यापार बिनधास्त सुरू आहे, असा सवाल आता सरळ जनतेतून विचारला जात आहे. दुर्गामातेचे विसर्जन होईल, रावणाचे दहन होईल; पण खरी वेळ लाला सारख्या बांडगुळ रावणाच्या दहनाची आहे, अशी कडवट प्रतिक्रिया नागरिकांतून उमटतेय.
सतीश जयसवाल उर्फ लाला या कुख्यात गुटखा माफियाने जालना जिल्ह्यात विषारी साम्राज्य उभे केले आहे. आणि सर्वात गंभीर म्हणजे, यावर कारवाई करण्यास पोलीस प्रशासनातील अधिकारी घाबरतात, कारण दरमहा लाखोंचा मलिदा त्यांना या माफियाकडून मिळतो, अशी चर्चा आता उघडपणे होत आहे.

भारतीय कायद्यानुसार तडीपार (बंदी) आदेश गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला कायद्याच्या अधीन राहून जिल्ह्याच्या सीमेतून हद्दपार करता येते. या आदेशाचे उल्लंघन करणे हा गंभीर गुन्हा आहे. खाद्य सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 (FSSAI Act) गुटख्याचे उत्पादन, साठा, वाहतूक व विक्री महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे. गुटखा सापडल्यास गुन्हा दाखल करून तुरुंगवास व दंडाची शिक्षा होते. भारतीय दंड संहिता (IPC) कलमे 188, 272, 273  जनतेच्या आरोग्याला अपायकारक वस्तूंचा व्यापार हा थेट फौजदारी गुन्हा आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56  समाजविघातक, गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती तडीपार करून समाजातून दूर ठेवण्याची जबाबदारी थेट जिल्हा पोलीस प्रमुखावर असते. म्हणजेच लाला सारखा  गुटखा माफिया जालना जिल्ह्यात मोकाट फिरतोय, हे स्वतःच कायद्याचे उल्लंघन आहे आणि यासाठी जबाबदार थेट पोलीस प्रशासन ठरते.

 याला जबाबदार कोण कोण?

जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) – तडीपार आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करणे, अवैध धंद्यांवर आळा घालणे ही थेट जबाबदारी एसपीची आहे.

स्थानिक पोलीस ठाण्याचे निरीक्षक (PI) – हद्दीत अवैध गुटखा सापडल्यास तत्काळ गुन्हे नोंदवणे आवश्यक.

गुप्तचर यंत्रणा – मोठ्या प्रमाणावर गुटखा जिल्ह्यात कसा येतो याचा तपास करून साखळी मोडणे.

अन्न व औषध प्रशासन (FDA) – गुटख्याचे साठेबाज व पुरवठादारांवर कारवाई करणे ही त्यांची कायदेशीर जबाबदारी.

जर हे सर्व यंत्रणा गप्प राहतात, तर यामागे आर्थिक देवाणघेवाण व संगनमत असल्याशिवाय ते शक्य नाही, असा जनतेचा स्पष्ट ठाम आरोप आहे.

 प्रशासनाला ‘मलिदा’…

दर महिन्याला लाखोंचा हप्ता माफियाकडून पोहोचतो आणि त्याच्या बदल्यात गुटखा साम्राज्य फोफावते – ही चर्चा केवळ चहाच्या टपरीवर नाही, तर आता नागरिकांच्या थेट आंदोलनाच्या घोषणांपर्यंत पोहोचली आहे.
ज्यांनी जनतेच्या सुरक्षेची शपथ घेतली, तेच विषारी गुटखा माफियाच्या हप्त्यावर गप्प बसतात, हे जालना जिल्ह्यासाठी लाजिरवाणे आहे, अशी रोषपूर्ण प्रतिक्रिया नागरिकांकडून दिली जात आहे.

 जनतेची मागणी – लाला या रावणाचे दहन झालेच पाहिजे!

जालना शहरात आज रावणाचे दहन होणार आहे; पण खरा रावण म्हणजे गुटखा माफिया लाला आहे, जो लाखो तरुणांचे जीवन उद्ध्वस्त करत आहे. त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई होऊन, पोलिस प्रशासनातील हप्ता घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावेत, अशी जनतेची एकमुखी मागणी आहे. रावण जाळून समाधान नाही, गुटखा माफियाचे जाळे मोडूनच खरी विजयादशमी साजरी होईल, असा जाहीर इशारा आता जनतेकडून देण्यात येत आहे.


संतोष भुतेकर…✍️ 

|Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!